- हरिदास लेंगरे
- हक्कांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून लढणार
सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र जनविकास माथाडी अँड ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा आज सांगलीत ९ वा वर्धापनदिनं आयोजित करण्यात आला होता. गेल्या ९ वर्षांपासून ही संघटना कामगारांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढत असून यापुढेही कामगारांच्या कल्याणासाठी सदैव कार्यरत राहील. तसेच महाराष्ट्रातील कामगारांच्या साठी शिवसेनेच्या वतीने व माथाडी कामगार संघटनेच्या वतीने संघर्ष करत राहीन. या देशाचे खरे मालक शेतकऱ्यांनी कामगार आहेत व त्यांच्यासाठी संघर्ष करत राहणार असा विश्वास संघटनेचे सरचिटणीस हरिदास लेंगरे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
सांगलीतल्या थोरले सुभेदार मल्हारराव होळकर चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक श्री. गौरव नायकवडी, शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख श्री. महेंद्रभाऊ चंडाळे, संपर्कप्रमुख सौ. सुनीताताई मोरे, सांगली शहरप्रमुख श्री. प्रताप पवार, सांगली शहरप्रमुख संदीप ताटे, कुपवाड शहर उपप्रमुख, श्री. सुखदेव काळे, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संयुक्त सरचिटणीस विलास काळे, सांगली जिल्हा अध्यक्ष बापू सरगर, सचिव राहुल दुधाळ, प्रवक्ते प्रकाश टिळे, श्री. समाधान सरगर, श्री. गजानन कोळेकर, श्री. बाळासाहेब कोळेकर, संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सचिव श्री. विकास बंडगर, तानाजी वाघमोडे, सचिन कांबळे या प्रमुख नेत्यांसह संघटनेचे पदाधिकारी व कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी कामगारांसमोर हक्क आणि अधिकारांच्या लढाईसंदर्भात बोलताना, हरिदास लेंगरे म्हणाले की, जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठी आहे. यामध्ये असंघटित कामगारांच्या संख्या लक्षणीय आहे. मात्र या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आज आपल्या संघटनेशिवाय कोणतीही संघटना पुढे येत नाही. आपल्या संघटनेने आतापर्यंत कामगारांच्या हक्कांचे संरक्षण केले आहे. कायद्याचे पालन करून कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आणखी बरेच प्रश्न कामगारांना भेडसावत असून यापुढेही संघटना हे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल.
याप्रसंगी बोलताना, शिवसेना नेते गौरवभाऊ नायकवडी यांनीही संघटनेचे आणि हरिदास लेंगरे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच कायमस्वरूपी संघटनेसोबत असल्याचे सांगितले. शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनीही कामगारांच्या नावावर कामगारांची लूट करणाऱ्यांचा समाचार घेतला. तसेच संघटनेत काम करणाऱ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आणि कामगारांना कोण धमकावत असेल तर त्यांची गाठ शिवसेनेसोबत आहे. हे संबंधितांनी लक्षात ठेवावे असा इशाराही दिला. यावेळी शिवसेनेचे नेते संजयबापू विभुते यांनीही कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ते सोडवणसाठी अशी चळवळ गरजेची असल्याचे सांगत, कामगारांच्या हितासाठी आपण सदैव हरिदास लेंगरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
शिवसेनेच्या महिला आघाडी संपर्कप्रमुख सौ. सुनीताताई मोरे यांनी महिलांसाठीही काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कामगार क्षेत्रात काम करत असताना महिलांसमोरही आज अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या अडचणी सोडवण्यासाठीही आपण पुढे आले पाहिजे असं सांगत, त्यांनी आपण स्वतः यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. असा ठाम विश्वासही व्यक्त केला. यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक सुभेदार एस. बी. गोदे आणि सुभेदार एन. ए. जाधव यांचा शाल, श्रीफळ, फेटा आणि स्मुर्तीचिन्ह देऊन विशेष सत्कार करून सैनिकांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सामाजिक कार्यकर्ते अमोल पांढरे यांनी केले तर आभार प्रकाश टिळे यांनी मानले राहुल दुधाळ विलास काळे पांडुरंग सरगर अनिकेत खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

