![]() |
| तासगाव : नेहरूनगर येथील शासन मालकीच्या जागेवरी प्लॉट वाटपाच्या आदेशनुसार प्लॉट मंजुरीचे पत्र स्वीकारताना पाटील कुटूंबीय. |
◼️ नेहरूनगर गावठाण हद्दीतील पहिलाच निर्णय
तासगाव / प्रतिनिधी
नेहरूनगर (ता, तासगाव ) येथील ६५ वर्षांपूर्वी शासकीय जमीनीचे वाटप करण्यात आले होते. त्यानुसार निवासी जिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्या हस्ते लिलादेवी दादासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश स्विकारला. यावेळी निमणीच्या सरपंच रेखा रविंद्र पाटील, माजी उपसरपंच आर. डी. पाटील, अंजली महेंद्र पाटील उपस्थित होते.
याबतची माहिती देताना आर. डी. पाटील यांनी सांगितले निमणी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील ग्रामस्थांना, नंदीवाले समाज व अनुसूचित जातीतील व इतर ग्रामस्थांना महाराष्ट्र सरकारने १९६० साली नाममात्र किमतींने रहिवाशी प्रयोजनार्थ प्लॉट वाटप केले होते. भूमि अभिलेख विभागामार्फत चौकशी करून १९८१ मध्ये या प्लॉटच्या नोंदी घेऊन त्यांना रितसर सिटी सर्वे क्रमांक देण्यात आले होते.या सर्व प्लॉटचे सत्ता प्रकार 'ब' व 'ग' असे आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे या प्लॉट पैकी लिलादेवी दादासाहेब पाटील यांच्या प्लॉटचा शर्तभंग नियमानुकुल करणेस महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली असून
नियमाप्रमाणे रक्कम वसूल करून सदर प्लॉट वर्ग २ मधुन वर्ग १ करून सत्ता प्रकार 'ग' बदलून 'सी' सत्ता प्रकार करणे जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. एकुण ९९ रहिवाशी प्रयोजनार्थ दिलेल्या प्लॉट पैकी हा पहिलाच प्लॉट आहे .सुमारे ६५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न व अडचण शासन व प्रशासनाने सोडविण्यासाठी सुरुवात केली आहे .या निर्णयामुळे नेहरूनगर गावठाण हद्दीतील सर्व प्लॉटचे नियमितीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
