yuva MAharashtra कर्तव्यपूर्ती, शिष्टाचाराचे पालन हेच देशप्रेमाचे खरे पुरावे

कर्तव्यपूर्ती, शिष्टाचाराचे पालन हेच देशप्रेमाचे खरे पुरावे

सांगली टाईम्स
By -
वीर बाजीप्रभू देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - शाहूवाडी येथील शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर.

◼️ प्रा. शिवाप्पा पाटील

◼️ पंच परिवर्तन व्याख्यानमालेस सुरवात

शाहूवाडी  / ( एस .टी . लष्कर )

नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव असावी. नागरी कर्तव्ये पूर्ण केल्याने   लोकशाहीची उत्कृष्टाकडे वाटचाल होण्यास हातभार लागेल. नागरी कर्तव्य आणि शिष्टाचार हे एकत्रितपणे देशाची सुरक्षितता, स्थिरता आणि प्रगतीसाठी महत्वाची मूल्ये आहेत. देशप्रेम केवळ घोषणांनी नव्हे, तर कर्तव्यपूर्ती आणि शिष्टाचाराचे पालन करुन दाखवले जाते, असे प्रतिपादन प्रा. शिवाप्पा पाटील यांनी केले. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत, कौशल्य विकास विभागाच्यावतीने 'पंच परिवर्तन' संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेत ते बोलत होते. शाहूवाडी येथील वीर बाजीप्रभू देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज (ता. ६) रोजी हा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल बामणे होते.

पुढे बोलताना प्रा. शिवाप्पा पाटील म्हणाले की, देशाच्या प्रतिष्ठेस आणि सार्वभौमत्वास धोका पोहचणार नाही यासाठी नागरिकांनी सजग होऊन केवळ अधिकारांची मागणी न करता त्याचबरोबर काही जबाबदाऱ्या आणि आचारधर्म पाळणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, अल्बर्ट आईन्स्टाईन, डॉ. जयंत नारळीकर आदी महान व्यक्तींच्या चरित्राचा मनापासून अभ्यास करावा, त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालावे, अंधश्रद्धेचा, नैराश्य भावनेचा त्याग करावा, संविधानाचा आदर राखून कायद्याचे पालन करावे आणि देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे असे आवाहन  पाटील यांनी केला. 

यावेळी  आय एम सी सदस्य श्रीमंत लष्कर, मलकापूरचे प्रतिष्ठीत व्यापारी महेश  विभूते यांनी मनोगते व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अनिल बामणे यांनी नागरी कर्तव्य व शिष्टाचारा मूळेच देश बलशाही होईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डॉ. अशोक जंगटे, चेतन भुरके आय एम सी सदस्य शरद दिवान, वीर बाजीप्रभू देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शाहूवाडीचे सर्व आजी माझी विद्यार्थी, प्रतिष्ठीत नागरिक, शिक्षक, शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते. प्रस्ताविक व स्वागत वंरिगे एस एस यांनी सुत्रसंचलन कमलाकर बागुल तर आभार  प्रल्हाद निकाळजे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गिताने झाली .

Tags: