◼️विद्यार्थी, नागरिकांचे हाल
◼️ वेळेत दाखले मिळत नसल्याने संताप
सांगली । प्रतिनिधी
येथीन सेतू कार्यालयातील सर्व्हर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तांत्रिक कारणात्सव डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. वारंवार तक्रार करुनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, उपस्थित कर्मचार्यांकडून विद्यार्थी, नागरिकांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. जिल्हाधिकार्यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून सर्व्हरची समस्या सोडवावी, मुजोर कर्मचार्यांना लगाम घालावा अन्यथा सेतू कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शैक्षणिक प्रवेश प्रक्रियांना वेग आला आहे. यासाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी सांगलीच्या सेतू कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. पण वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. कधी कधी सर्व्हर पूर्णपणे बंद पडते. कधी सुरु होते, तर क्षणात बंद पडते. महिनभरापासून हा खेळ सुरु आहे. विद्यार्थी, नागरिकांना नाहक मनस्माप सहन करावा लागत आहे.
मुजोर कर्मचार्यांना लगाम घालासेतू कार्यालयामध्ये अनेक मुजोर कर्मचार्यांचा भरणा आहे. विद्यार्थी, नागरिकांना व्यवस्थित माहिती न देणे, त्यांच्याशी उध्दट वर्तण करणे, विनाकारण थांबवून ठेवणे, वारंवार हेलपाटे मारायला लावणे आदी तक्रारी येत आहेत. सर्व्हर च्या नावाखाली कामचुकारपणा केला जात आहे. याशिवाय एजंटाची कामे प्राधान्याने केली जात असल्याची चर्चा आहे. अशा कर्मचार्यांना जिल्हाधिकार्यांनी शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.
सेतू कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. दिवसदिवसभर सेतू कार्यालयामध्ये थांबावे लागत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अप्पर तहसिलदार यांच्याकडे वारंवार तक्रार करुनही याकडे लक्ष दिले जात नाही अशा तक्रारी आहेत. वेळेत दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीच यामध्ये लक्ष घालावे. सर्व्हरबाबतची तक्रार निकाली काढावी अन्यथा सेतू कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
