◼️पुण्यतिथीवेळी 'जलदुत' उल्लेख
◼️ हजारोंकडून आदरांजली
सांगली / प्रतिनिधी
कडेगांव, खानापूर दुष्काळी भागाचा कलंक पुसणारे, 'मला मंत्रीपद नको माझ्या भागाला पाणी द्या' असे म्हणत दुष्काळी भागात पाणी योजना कार्यान्वित करणारे थोर व्यक्तिमत्त्व स्व. आ. संपतराव (आण्णा) देशमुख यांना २९ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी कडेपुर येथील निवासस्थानी मा. आम. पृथ्वीराज देशमुख, सतीश (भाऊ) देशमुख व देशमुख कुटुंबीयासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी स्व. संपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. स्व. संपतराव आण्णांनी जुन्या भिलवडी - वांगी मतदारसंघात १९९५ साली स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्यासारख्या बलाढ्य व्यक्तीबरोबर अपक्ष निवडणूक लढवत त्यांचा पराभव केला. निवडणूक जिंकल्यानंतर युती सरकारमध्ये त्यांना मंत्री पदाची संधी चालून आली होती परंतु आण्णांनी मंत्री पद डावलून अपक्ष उमेदवारांची मोट बांधून 'मला मंत्री पद नको पण माझ्या दुष्काळी भागाला पाणी द्या' अशी मागणी केली.
युती शासनाकडून संपतराव आण्णांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या दुष्काळी भागातील ताकारी, टेंभू योजनांना भरघोस निधी देत योजना कार्यान्वित केल्या अशा या थोर व्यक्तिमत्त्वाच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त हजारो कार्यकर्त्यांकडून कडेपूर येथील निवासस्थानी 'जलदूत' असा उल्लेख करत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी देशमुख कुटुंबीयाकडून स्व. संपतराव आण्णांचे बंधु सयाजीराव देशमुख, पुतणे मा. आ. पृथ्वीराज देशमुख, कडेपुरचे सरपंच सतीश देशमुख, आण्णांचे चिरंजीव जयदीप देशमुख, रविराज देशमुख, जयराज देशमुख उपस्थित होते.
यावेळी भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सम्राट (बाबा) महाडिक, मा. आ. विलासराव जगताप, आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत, आ. सुहास बाबर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, किरण लाड, शरद लाड, रणधीर नाईक, विनोद गुळवणी तसेच कवठेमंकाळ तालुक्यातून पांडुरंग पाटील, गजानन कोठावळे, आजम मकानदार, अनिल लोंढे, उदयराज शिंदे, मिलिंद कोरे, रमेश साबळे, जतचे प्रमोद सावंत, विक्रम पाटील, जिल्हा मजूर फेडरेशनचे विठ्ठल खोत, सुनील ताटे, अशोक पाटील, साहेबराव काळेबाग, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, आबासाहेब देशमुख, बंडोपंत राजोपाध्ये, निरंजन आवटी मोहन व्हनखंडे, सुहास पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, कडेगाव उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार अजित शेलार उपस्थित होते.
कडेगांव तालुक्यातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ सूर्यवंशी, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, माजी सभापती मंगल ताई शिरसागर, मंदाताई करांडे, माजी उपसभापती रवींद्र कांबळे, आशिष घाडगे, लक्ष्मण कणसे, विजय करांडे विजय देशमुख नेरलीचे सरपंच राजाराम शिंदे, रायगावचे सरपंच अर्चना घाडगे, उपळेचे सरपंच बाबुराव माने, लक्ष्मण शिंदे तसेच पलूस तालुक्यातून सर्जेराव नलवडे, पैलवान मिलिंद पाटील, रामानंद पाटील, आकाराम पाटील, संपतराव पाटील, सुनील जाधव, विजय चोपडे, जवाहर पाटील, सुखदेव पाटील, अतुल पाटील, विश्वजीत पाटील, प्रशांत बंडगर, प्रवीण सूर्यवंशी, आप्पासाहेब सूर्यवंशी हे उपस्थित होते.
.jpg)