◼️तासगावातील निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची मागणी
◼️सोमवारी निवड प्रक्रिया
तासगाव / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिपक बाबा शिंदे म्हैशाळकर यांची पुन्हा निवड व्हावी, अशी मागणी तासगाव तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील भाजपा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीने पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार दिनांक २१ रोजी सांगली ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून आमदार सुभाष देशमुख यांची नियुक्ती केली आहे. दिपक बाबा शिंदे म्हैशाळकर यांच्या जिल्हाध्यक्ष कार्यकाळात भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांनी संघटनात्मक बांधणीमध्ये चांगले लक्ष घालून प्रदेश पातळीवर आपला ठसा उमटवलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा स्थापना दिनी सांगली ग्रामीण मध्ये पक्ष सदस्य व सक्रिय सभासद नोंदणी मध्ये उच्च अंकी नोंदणी केल्याबद्दल गौरवलेले आहे. दिपक बाबा शिंदे म्हैशाळकर हे उच्चविद्या विभूषित असून भाजपच्या नव्या व जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून योग्य पद्धतीने कारभार करतील अशी सर्वांना आशा आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टी सध्या केंद्रात व राज्यात सत्तेत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये भाजपचे चार आमदार निवडून आलेले आहेत. नजीकच्या काळात महापालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने भाजपातील सर्व गटातटांना चालणारा जिल्हाध्यक्ष झाल्यास भाजप पक्षाची ग्रामीण तळागाळा मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
