yuva MAharashtra माईंगडेवाडीच्या भराडी देवीची यात्रा रविवारपासून

माईंगडेवाडीच्या भराडी देवीची यात्रा रविवारपासून

सांगली टाईम्स
By -


सांगली / प्रतिनिधी

माईंगडेवाडी (ता. पाटण) येथील आई भराडी देवीची यात्रेस रविवार २० एप्रिल पासून सुरवात होत आहे. रविवार आणि सोमवार दोन दिवस यात्रा असते. पाटणसह तालुक्यातील अन्य गावातील असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात.

या वर्षी मंदिराचे नव्याने जीर्णोद्धार काम चालू आहे. पाटण तालुक्यातील अनेक भक्त आईच्या दर्शनाला येतात. जिंति गावची नवलंबाबाई, निगडे गावची जरडी काळंबा आई, मोडकवाडी भैरी हेळोबा हे देव आई भराडी देवीच्या यात्रेला आईच्या भेटीला येतात.  मोठ्या उत्साहात हा यात्रा उत्सव साजरा होतो. 

रविवार २० एप्रिल रोजी मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक  कार्यक्रम तर सोमवार २१ तारखेला सकाळी ८ वाजता छबिना निघतो. त्या नंतर महाप्रसाद होतो. हजारो भाविकांच्या उपस्थितीत आनंदात साजरा होणारा उत्सव म्हणजे आई भराडी देवी यात्रा उत्सव असतो.

Tags: