◼️न्यायाधीश सुनीता तिवारी यांचे प्रतिपादन
सांगली / प्रतिनिधी
मराठी भाषा पंधरवडा निमित्त कौटुंबिक न्यायालय सांगली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मा न्यायाधीश सुनीता तिवारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे वक्ते दीपक पाटणकर यांनी अनेक विध काव्यामधून मराठी भाषेचे सौंदर्य वर्णन केले. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ फारुक कोतवाल, विधीज्ञ एस एम पखाली, विधीज्ञ विक्रम सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना कौटुंबिक न्यायालयाच्या मा न्यायाधीश सुनीता तिवारी यांनी आपल्या सदाबहार शैलीत मराठीची भारी छाप पाडली त्या म्हणाल्या "माय मराठी भाषेने ममत्वाने आपल्या मध्ये सर्वांना सामावून घेतले आहे. अशा वैभवसंपन्न मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास धोतरे यांनी केले तर आभार श्रृती दुधगावकर यांनी मानले. यावेळी अधिक्षक शैलजा वेदपाठक, कर्मचारी विकास राऊत, संजय लोणकर, महेश खटावकर, प्रतिभा महाडिक, सुनिता चौगुले, शरद चांडवले, तृप्ती फासे, अंगरक्षक अश्विन सोनकर, महिला पोलिस नागिना पाटील तसेच वकिलवर्ग व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
