yuva MAharashtra ऊर्जा साठवणुकीसाठी पंप्ड स्टोरेज प्रकल्पांना गती देणार

ऊर्जा साठवणुकीसाठी पंप्ड स्टोरेज प्रकल्पांना गती देणार

सांगली टाईम्स
By -


◼️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय 

मुंबई / प्रतिनिधी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे राज्यातील वीज उपलब्धता वाढवण्यासाठी आणि पंप्ड स्टोरेज प्रकल्पांच्या (PSPs) अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. शासनाने सार्वजनिक-खाजगी भागीदारीद्वारे PSPs, LIS (लिफ्ट इरिगेशन स्कीम) सह PSPs आणि संकरित सौर किंवा अन्य अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी धोरण स्वीकारले आहे. या धोरण अंतर्गत करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार सुरू असलेल्या 38 पंप्ड स्टोरेज प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

पंप्ड स्टोरेज धोरणामुळे राज्यात वीज साठवणूक सक्षम होईल आणि ग्रिड अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनेल.

यातून –

✅मेगावॅट स्तरावरील ऊर्जा साठवण प्रकल्प विकसित होतील.

✅पायाभूत सुविधा व उपलब्ध जमिनीचा योग्य वापर करता येईल.

✅जल-सौर संकरित ऊर्जा प्रकल्पांना चालना मिळेल.

✅पाण्याच्या आंतर-बेसिन हस्तांतरणासाठी मोठ्या लिफ्ट सिंचन योजनांना मदत होईल.

✅खासगी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.

बैठकीस मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: