yuva MAharashtra सांगली जिल्ह्यात 'ऊबाठा' गटाला खिंडार

सांगली जिल्ह्यात 'ऊबाठा' गटाला खिंडार

सांगली टाईम्स
By -

 तासगाव तालुका प्रमुख प्रदीप माने यांचा जय महाराष्ट्र्

सांगली / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. पक्षाचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप माने पाटील यांनी असंख्य समर्थकांसह उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. माने - पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने सांगली जिल्ह्यातील ठाकरे गट बॅकफुटवर गेला आहे. दरम्यान शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती निष्ठेने पार पाडू. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी भक्कम करू अशी ग्वाही माने पाटील यांनी दिली.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे मुक्तागिरी या बंगल्यात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. खानापूर - आटपाडीचे आमदार सुहास बाबर, सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी आदी यावेळी उपस्थित होते. 

 यावेळी राज्य आरोग्य  कर्मचारी संघटनेचे अरुण खरमाटे, शहर प्रमुख विशाल शिंदे, तालुका संघटक दत्तात्रय चवदार, पैलवान संजय माने तानाजी पाटील, प्रताप माने पाटील सांगली जिल्हा संपर्क संघटिका ज्योतीताई दांडेकर,जिल्हा संघटिका आशाताई पोद्दार, तालुका संघटिका छायाताई पाटील, उपजिल्हा संघटिका फाल्गुनी शिंदे,  युवती शहर प्रमुख सोनाली भोसले यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान माने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. 


Tags: