![]() |
| नवी दिल्ली : उजेडाचे प्रवासी या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आदी. |
नवी दिल्ली / प्रतिनिधी
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे दिल्लीतील मराठी जनांनी लिहिलेल्या आणि श्री. जीवन तळेगावकर यांनी संपादित केलेल्या ‘उजेडाचे प्रवासी’ या कवितासंग्रहाचे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी दिल्लीमधील कर्तृत्ववान मराठीजनांचा आणि कवितासंग्रहात समाविष्ट केलेल्या कवितांच्या कवींचा सन्मानही करण्यात आला. केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेले संमेलन हे देशाच्या राजधानीत होत आहे. ही समस्त मराठी जनांसाठी आनंददायी बाब आहे.
हे ऐतिहासिक संमेलन यशस्वी करा असे. आवाहन मंत्री मोहोळ यांनी दिल्लीतील मराठीजनांना केले. संमेलनासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी महाराष्ट्राचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री मा.श्री. उदयजी सामंत यांच्यासह डॉ. ज्ञानेश्वर मुळे, डॉ. सच्चिदानंद जोशी, डॉ. सदानंद मोरे, श्री. संजय नहार, श्री. महेंद्र लड्डा आणि दिल्ली मराठीजनांची उपस्थिती होती.
