yuva MAharashtra प्रशांत गौंडाजे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

प्रशांत गौंडाजे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

सांगली टाईम्स
By -

 

निर्वाण कल्याणक समितीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी

सांगली / प्रतिनिधी

भगवान महावीरांच्या २ हजार ५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त शासनाने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. राज्य शासनाने प्रत्येक जिल्हानिहाय कल्याणक महोत्सव समिती गठित केली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल भाजप जैन प्रकोष्ठचे पदाधिकारी प्रशांत गौंडाजे यांना राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चैनसुख संचीती, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी आदी उपस्थित होते. 

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर म्हणून भगवान महावीर यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने शासन विविध उपक्रम आयोजित केले होते. महावीरांच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त शासनाने कौशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरावर समिती गठित केली आहे. यामध्ये प्रशांत गौंडाजे यांची निवड झाली होती. 

ADVT.

निर्वाण वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशांत गौंडाजे यांचा राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राजभवन येथे हा कार्यक्रम झाला. दरम्यान राजभवन येथे सन्मान होणे हा माझ्यासाठी मोठा गौरवास्पद क्षण असल्याचे  गौंडाजे यांनी सांगितले. 


Tags: