yuva MAharashtra भल्या पहाटे वृत्तपत्र विक्रेत्यांचे रयतेच्या राजाला अभिवादन

भल्या पहाटे वृत्तपत्र विक्रेत्यांचे रयतेच्या राजाला अभिवादन

सांगली टाईम्स
By -
सांगली शहर वृत्तपत्र वितरण केंद्रावर शिवाजी महाराज जयंती साजरी करताना सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते.


 सांगली / प्रतिनिधी 

सांगली सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने सांगली शहरातील वृत्तपत्र वितरण केंद्रावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे शहर उपाध्यक्ष कृष्णा जामदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हा सचिव विशाल रासनकर, मनपा क्षेत्र अध्यक्ष दिपक वाघमारे, कृष्णा जामदार, नागेश कोरे, बाळासाहेब पोरे, शहर अध्यक्ष सागर घोरपडे यांनी सेंटरवर भगव्या पताका व भगवे फेटे लावून आकर्षक सजावट केली होती. उपस्थितीत वृत्तपत्र विक्रेता मिठाई वाटप करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी कार्यकारणी सदस्य मारूती नवलाई, जेष्ठ विक्रेते प्रदिप आसगवाकर, सचिन माळी, बसाप्पा पट्टणशेट्टी, नारायण माळी, यशवंत जाधव, प्रकाश कुंभार, सुरेश कांबळे, संजय कांबळे, दीपक सूर्यवंशी, महेश मुजूमदार, दीपक गावडे, शशिकांत खिलारे, चांद मुल्ला, दत्ता चव्हाण, प्रशांत साळुंखे, बिपीप गवळी, अशोक साळुंखे, अतुल रूपनर, मुन्ना मुल्ला, जावेद शेख, प्रथमेश मोरे, श्रीपती रासनकर, सुभाष बंड्याघोळ, गजानन खरात, अमोल कोरे, महेश वैद्य, सुनिल माळवदकर, महीला वृत्तपत्र विक्रेता अश्‍विनी नवलाई यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

Tags: