yuva MAharashtra मराठी नाट्यपरिषद सांगली उपनगर शाखा २ च्या अध्यक्षपदी विनय देशपांडे

मराठी नाट्यपरिषद सांगली उपनगर शाखा २ च्या अध्यक्षपदी विनय देशपांडे

सांगली टाईम्स
By -

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली उपनगर २ शाखा
(उभे डावीकडून) श्री. यशवंत कुलकर्णी, श्री. युसुफ पठाण, श्री. शहाबाज नायकवडी, श्री. (अवधुत कदम, श्री. प्रसन्न कुलकर्णी,
श्री. सचिन खुरपे, (बसलेले डावीकडून) श्री. प्रदिप कुलकर्णी, श्री. संदीप पाटील (निरिक्षक), श्री. विनय देशपांडे श्री. मुकुंद पटवर्धन (मार्गदर्शक) सौ. प्राची गोडबोले

उपाध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी; पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

सांगली / प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली उपनगर २ शाखेची सन २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य व निरीक्षक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शाखेच्या सन २०२५-३० या सालासाठी कार्यकारी समितीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. यामध्ये शाखेच्या अध्यक्षपदी विनय देशपांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अन्य कार्यकारिणी सदयांचीही निवड बिनविरोध झाली. 
सभेच्या सुरवातीला मागील वर्षात दिवंगत झालेल्या नाट्य, चित्रपट, सैन्य अशा सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांना बंदन करून सभेची सुरुवात झाली. नाट्य क्षेत्रात विविध पारिविनयतोषिक मिळवलेल्या शाखेच्या सभासदांचा यावेळी निरीक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेच्या पटलावरील सर्व विषयांबाबत साधकबाधक चर्चा झाली. उपस्थित सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली. यावेळी शाखेची सन २०२५-३० या सालासाठी कार्यकारी समितीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली उपनगर २ शाखा ची सन २०२५-३० साठी नवी 
कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे -

विनय नारायण देशपांडे (अध्यक्ष)
प्रदिप कुलकर्णी (उपाध्यक्ष, प्रशासन)
प्राची गोडबोले (उपाध्यक्ष, उपक्रम)
सचिन खुरपे (प्रमुख कार्यवाह)
यशवंत कुलकर्णी (सह कार्यवाह)
ॲड. शहाबाज नायकवडी (कोषाध्यक्ष)
शरद मगदूम (सदस्य)
युसुफ नदाफ  (सदस्य)
मकरंद कुलकर्णी  (सदस्य)
अवधूत कदम (सदस्य)
प्रसन्न कुलकर्णी (सदस्य)
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यशवंत कुलकर्णी, प्रस्तावना उदय गोडबोले यांनी केली तसेच शाखेयर मार्गदर्शक, सल्लागार म्हणून कार्यरत राहण्याठी नियामक मंडळ सदस्य, मुकुंद पटवर्धन यांना विनंती केली. प्राची गोडबोले यांनी शाखेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन सभासदांना केले. शाखेचा मागील गोषवारा सचिन खुरपे यांनी सादर केला. ज्याला सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. अध्यक्षीय भाषणात विनय देशपांडे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदे असली तरी शाखेचे सर्व उपक्रम सर्व सभासदांनी एकत्र येवून करावेत असे आवाहन केले.
निरीक्षक संदीप पाटील यांनी शाखेच्या भविष्यातील वाटचालीसाठी नव्या कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. तर नियामक मंडळ सदस्य मुकुंद पटवर्धन यांनीही नव्या कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या व काही मौलिक सूचना केल्या. शाखेचे ज्येष्ठ सभासद, कलावंत विजयकुमार खाडे यांनी सभासदांच्यावतीने नव्या कार्यकारी सदस्यांसमोर शाखेसाठी काही उपक्रम सुचवले. वार्षिक सभा व्यवस्थित पार पाडण्यासाठी नव्या कार्यकारणीतील सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी कुंदन खाडे, चंद्रकांत गायकवाड, गणेश जोशी, जहाँगीर तांबोळी, अनिल कोरे, तन्वी कुलकर्णी, पांडुरंग जोशी, प्रितम पेडणेकर, सागर घारगे, अभिजीत धारगे, भगवान मोहिते, राजू मोहिते, अर्जुन मोहिते, सोहेब मिरजे, सचिन ठाणेकर, लमुवेल माने, अरूण कदम, शुभदा कदम, आयुबराज ऐनापूरे, वैशाली खरे, माणिक जाधव, अमोल लाटवडे, अभय खाडीलकर, हरिष जाधव, निखिल पेडणेकर, दीपाली कुलकर्णी, राजू मोहिते, अमृता खुरपे तसेच इतर सभासद उपस्थित होते.
Tags: