![]() |
| एक तास राष्ट्रवादीसाठी विचार मंथन बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज. बाजूस माजी नगरसेवक हरिदास पडळकर, अभिजित हारागे, महालिंग हेगडे. |
निवडणुकीसाठी सज्ज रहा; बूथ कमिट्या सक्षम करा. ; बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना
सांगली / प्रतिनिधी
महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा. बूथ कमीट्या सक्षम करा, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. ३३ व्या 'एक तास राष्ट्रवादीसाठी' विचार मंथन बैठकीत ते बोलत होते.
सांगलीतील पक्षाच्या कार्यालयात एक तास राष्ट्रवादीसाठी विचार मंथन बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी या बैठकीचे आयोजन केले जाते. बैठकीमध्ये देश, राज्य, जिल्हा, तालुका, गावाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा करण्यात येते. शनिवारी ३३ वी बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत बैठकीचे स्वरूप स्पष्ट केले.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज रहावे.बूथ कमिट्या सक्षम कराव्यात. दरम्यान जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीत मध्यवर्ती निदान केंद्र सुरू करण्यात आले. त्याच धर्तीवर स्वर्गीय घनश्याम बजाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निदान केंद्र सुरू केले जाईल. यामध्ये अल्प दरामध्ये रुग्णांच्या तपासण्या केल्या जातील अशी घोषणाही बजाज यांनी यावेळी बोलताना केली. हे निदान केंद्र शरदचंद्र पवार आरोग्य संजवनी मित्र सांगली जिल्हा प्रमुख उमर गवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु राहणार आहे.
बैठकीत भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पक्षाचे मिरज अध्यक्ष अभिजित हारगे, माजी नगरसेवक हरिदास पाटील, जुबेर चौधरी, वैशाली धुमाळ, छाया जाधव, अनिता पांगम, संगिता जाधव, विद्या कांबळे, सुरेखा सातपुते, समीर कुपवाडे, डॉ शुभम जाधव, उमर गवंडी, अर्जुन कांबळे, अक्षय अलकुंटे, प्रकाश सूर्यवंशी, प्रणवी पाटील, अज्जू पटेल, बाळासाहेब गोंधळे, विनायक हेगडे, मुन्ना शेख,शितल खाडे, फिरोज मुल्ला, नंदकुमार घाडगे, कुमार वायदंडे,सद्दाम मुजावर, आदित्य नाईक, पूजा आवळे, दत्ता पाटील, विश्वासराव लोंढे, स्नेहल चंदनशिवे, सविता कोरे,परवीन फकीर,लक्ष्मण मोने, अभिजित रांजणे, संजय पवार, जावेद जमादार, संजय कांबळे, दीपक पवार, समर्थ आरगे, आदर्श कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

