![]() |
| शिरवळ येथे एका कार्यक्रमात संभाजी भिडे गुरुजी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. |
सांगली / प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरवळ येथे एका कार्यक्रमात श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले. स्वतः फडणवीस यांनी याबाबत समाज मध्यामवर माहिती दिली आहे.
शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून संभाजी भिडे गुरुजी यांची पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात मोठी ताकद आहे. युवकांची मोठी फळी त्यांच्या मागे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची पिढी घडविण्यासाठी गुरुजींच्या संकल्पनेतून गड - कोट, किल्ल्यांच्या मोहिमा दरवर्षी काढल्या जातात. हिंदू, हिंदुत्व या बाबत जनजागृती केली जाते.
संभाजी भिडे गुरुजींची महायुतीला नेहमीच साथ राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपचे दिग्गज नेते भिडे गुरुजींना सातत्याने भेटत असतात. त्यांचे आशीर्वाद घेत असतात. दरम्यान शुक्रवारी शिरवळ येथे एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुजींची भेट घेतली. आशीर्वाद घेतले. स्वतः फडणवीस यांनी याबाबत समाज माध्यमावर माहिती दिली आहे.
