yuva MAharashtra जत मध्ये शुक्रवारी आ. गोपीचंद पडळकर यांचा नागरी सत्कार

जत मध्ये शुक्रवारी आ. गोपीचंद पडळकर यांचा नागरी सत्कार

सांगली टाईम्स
By -
आमदार गोपीचंद पडळकर

हत्ती वरून पेढे, साखर वाटली जाणार; मिरवणूक, गांधी चौकात सभेचेही आयोजन

सांगली / प्रतिनिधी
जत विधानसभा मतदार संघातून विजयश्री खेचून आणणारे, बहुजन हृदयसम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन शुक्रवार दि. १० रोजी जत येथे करण्यात आले आहे. मिरवणूक, सभा, हत्तीवरून पेढे वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन जत शहर भारतीय जनता पार्टी  व आमदार पडळकर साहेब कट्टर समर्थकांकडून करण्यात आले आहे.

टीम देवेंद्र मधील विश्वासू म्हणून आमदार पडळकर यांची ओळख आहे. प्रचंड राजकीय संघर्षातून पडळकर यांनी आमदारकीला गवसणी घातली आहे. फडणवीस यांनी धाडस करून प्रस्थापितांना डावलत त्यांना जत विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. पडळकर यांनी फडणवीस यांचा विश्वास सार्थ ठरवला. जत विधानसभा मतदार संघात भाजपचे कमळ फुलविले. एक आक्रमक, विकासात्मक नेता म्हणून आमदार पडळकर यांची ओळख आहे. हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर आमदार पडळकर यांनी जत तालुक्यात झंझावाती आभार दौरा सुरू केला आहे.

दरम्यान येत्या शुक्रवार १० जानेवारी रोजी आमदार पडळकर यांच्या भव्य सत्काराचे आयोजन जत शहरात करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता गांधी चौक, मारुती मंदिर जवळ सभा व सत्कार सोहळा होणार आहे. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पेठ ते गांधी चौक अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी हत्तीवरून पेढे आणि साखर वाटपही करण्यात येणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जत शहर भाजप व आमदार गोपीचंद पडळकर साहेब कट्टर समर्थक यांच्याकडून करण्यात आले आहे.