yuva MAharashtra सांगलीत सावित्रीबाई फुलेंचे स्मारक करा

सांगलीत सावित्रीबाई फुलेंचे स्मारक करा

सांगली टाईम्स
By -

 

महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील. बाजूस अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते.


जयश्रीताई पाटील; महापालिका आयुक्तांकडे मागणी

सांगली / प्रतिनिधी
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे सांगली शहरात उचित स्मारक उभा करावे. त्यांचा पूर्णाकृती पुतळा, वाचनालय, स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा यामधे समावेश असावा अशी मागाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
   पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये, देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. या निमित्ताने त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात मिरज वगळता सावित्रीबाई फुले यांचे कोठेही उचित स्मारक नाही. त्यांचा पुतळा नाही. वास्तविक सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने महिलांच्या उद्धारक आहेत. त्यांच्या त्यागामुळेच महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली. यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. मानहानी पत्करावी लागली. 


तरीही त्यांनी न डगमगता महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली. अश्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक सांगली शहरात व्हावे अशी समस्त सांगलीकरांची भावना आहे. त्यांचा पूर्णाकृती पुतळा, स्मारक, महिलांसाठी वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र आदी गोष्टींचा या मध्ये समावेश असावा. यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करावेत. पुतळ्यासाठी जागा निश्चित करावी असे म्हंटले आहे. यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेवा दल जिल्हाध्यक्ष युवराज नाईकवाडे, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मुजफ्फर सनदी, सांगली शहर अध्यक्ष किशोर जगदाळे,कुपवाड युवक अध्यक्ष दादासाहेब कोळेकर, सेवादल शहर जिल्हा उपाध्यक्ष दीपा शहा,अर्चना घाडगे, आदी उपस्थित होते.
Tags: