yuva MAharashtra कुपवाडमध्ये उद्यापासून भव्य कीर्तन महोत्सव

कुपवाडमध्ये उद्यापासून भव्य कीर्तन महोत्सव

सांगली टाईम्स
By -

शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन; माजी गजानन मगदुम यांची माहिती


कुपवाड / प्रतिनिधी

 येथील शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समिती यांच्यावतीने उद्या पाच ते मंगळवार सात जानेवारी २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत 'गजर कीर्तनाचा...सोहळा विठ्ठल भक्तांचा' या अंतर्गत भव्य कीर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अकुज ड्रीमलॅंडच्या मैदानावर दररोज रात्री आठ ते दहा वेळेत कीर्तने होतील, अशी माहिती संयोजक माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी दिली.
 मगदूम म्हणाले, किर्तन महोत्सव सोहळ्याचे यंदाचे नववे वर्ष आहे.  यापूर्वी झालेल्या कीर्तन महोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर, बंडातात्या कराडकर, ज्ञानेश्वर माऊली चाळक, चैतन्य महाराज वाडेकर, भगवतीताई सातारकर, प्रकाश साठे महाराज, शिवलीला पाटील, कृष्णामहाराज चाळक व चैतन्य महाराज सातारकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यंदा ५ ते ७ जानेवारी अशा तीन दिवस कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज रविवारी ५ रोजी महिला कीर्तनकार ह.भ.प. सौ.रोहिणीताई परांजपे (पुणे), सोमवार ६ रोजी भागवताचार्य पुरुषोत्तम पाटील महाराज (बुलढाणा) व मंगळवार ७ रोजी राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते कबीर आत्तार महाराजांचे कीर्तन होणार आहे.  


कुपवाडमधील अकुज ड्रीमलॅंडच्या मैदानावर दररोज रात्री आठ ते दहा वेळेत कीर्तने होतील. त्याअगोदर सायंकाळी पाच ते सात यावेळेत दोन तास हरिपाठाचा कार्यक्रम होईल. ७ जानेवारीला कबीर आत्तार महाराज यांच्या कीर्तन समाप्तीनंतर उपस्थितांसाठी  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानावर महिला-पुरुषांची स्वतंत्र भव्य बैठक व ध्वनी व्यवस्थेची सुविधा आहे. या कीर्तन सोहळ्यासाठी समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक मगदूम यांसह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समितीने केले आहे. 
Tags: