 |
एक आरोपी मयत; खून प्रकरणी शिक्षा; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय |
सांगली / प्रतिनिधी
अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित तमाशात दंगा करणाऱ्यांचा पंचकमिटीकडे तक्रार केल्याच्या रागातून अशोक तानाजी भोसले यांच्या खून प्रकरणातील पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी. वाय. गौड यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर यातील एक आरोपीचा सुनावणी सुरु असताना मृत्यू झाला. याकामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले. या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
संदीप दादासो चौगुले (वय २६), विशाल बिरुदेव चौगुले (वय २३), नानासो उर्फ सागर माणिक चौगुले (वय २०), कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कनप (वय २५) आणि विजय आप्पासो चौगुले (वय २३ सर्व रा. अग्रण धुळगाव) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. तर सागर बाळासो चौगुले हा मयत झाला आहे. तर बिरू पांडुरंग कोळेकर या संशयीताला निर्दोष करण्यात आले आहे. यापैकी संदीप व विशाल चौगुले गेली ७ वर्ष न्यायालयीन कोठडीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, धुळगाव येथे २ डिसेंबर २०१७ रोजी देवीच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम होता.
या गुन्हयाचा तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केला. यानंतर पुढील तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांच्याकडे सुपूर्त केला होता. त्यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्याची सुनावणी दोन वर्ष सुरू होती. बचाव पक्षातर्फे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला होता.
कार्यक्रमांमध्ये संशयित आरोपी दंगा करत असल्याची तक्रार मयत अशोक व व त्यांचा भाऊ प्रकाश भोसले यांनी यात्रा कमिटीकडे केली होती. त्याचा राग मनात धरून रात्री एकच्या दरम्यान आरोपींनी अशोक भोसले गुप्ती कुकरी व काट्याने अशोक व प्रकाशवर खुनी हल्ला केला. अशोक यांच्या मांडीवर अनेक कमरेखाली धारदार हत्यारांनी भोकसून अनेक वार केले. तसेच काठ्याने पाठीवर जबर मारहाण केली. अशोक यांच्या मांडीवर अनेक कमरेखाली धारदार हत्यारांनी भोकसून अनेक वार केले. तसेच काठ्याने पाठीवर जबर मारहाण केली. या घटनेमध्ये प्रकाश यांच्या डोळ्यावर हातावर व कमरेवर काट्याने जबर मारहाण करून जखमी केले. आकाश यांच्यावर केलेले वार वर मी लागल्याने त्यांना कवठेमंकाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले तिथे डॉक्टरानी अशोक यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कवठेमंकाळ पोलिसांमध्ये ७ आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.