डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त उपक्रम
सांगली / प्रतिनिधी
पलूस - कडेगांव तालुक्याचे भाग्यविधाते, काँग्रेसचे ज्येष्ठ माजी मंत्री स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त सांगली येथील गव्हर्मेट कॉलनीतील श्री ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान संचलित चैतन्याश्रम या वृद्धाश्रमात भारती हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. आश्रमातील सर्व आश्रम वासियांची ब्लड शुगर, सीबीसी, ईसीजी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमात डॉ. प्रणव पाटील, डॉ. मधुरा किल्लेदार, डॉ. ऋतुराज चव्हाण, तसेच सरिता माने, अतुल चौगुले, गणेश काशीद, आशिष मोहिते, प्रमोद दबडे व मनोज पाटील यांनी सहभाग घेतला. आश्रमाच्या संचालिका रोहिणी इनामदार, प्रिया तेरदाळ , सर्व आश्रमवासीय, उपस्थित होते. यावेळी भारती हॉस्पिटल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, रिजनल डायरेक्टर डॉ. एच. एम.कदम तसेच विद्यापीठ शाखा प्रमुख डॉ. सारा धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
